पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या चार प्रभागांतील चार जागांच्या निवडणुकीसाठी 28 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. मंगळवारी झालेल्या छाननीत यातील आठ नामनिर्देशनपत्रे बाद झाली. त्यामुळे आता एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 5) दिली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पाली नगरपंचायतच्या प्रभाग क्र. 2, 5, 8 व 14 या चार प्रभागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 2 व 14 सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक 5 आणि 8 सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी सोमवार (दि. 10)पर्यंत मुदत आहे. त्यानंतरच येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.