उरण : बातमीदार
तालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाजवळ बुधवारी (दि. 1) तेलाचा एक कंटेनर उलटला. त्यामुळे तेल रस्त्यावर पसरून वाहतूक जवळपास पाच ते सहा तास ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून निघालेल्या ट्रायटोन मल्टिमोडल लिमिटेड कंपनीच्या ट्रेलरवरून नेण्यात येणारे दोन 20 फुटी कंटेनर न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर उलटले.
या वेळी रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे येथील वाहतूक त्वरित बंद करण्यात आली. जेएनपीटी व सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील तेल साफ केले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत झाला.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …