अलिबाग : प्रतिनिधी
फटाक्यांची आतषबाजी करीत रायगड जिल्ह्यामध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा सुटीचा दिवस नव्हता तरीही किनार्यांवरील गाव-वाड्यांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशिद, आवास, नागाव, रेवदंडा आदी ठिकाणी हॉटेल्समध्ये पाटर्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर बार, रेस्टॉरंट, मॉल, ढाबे, फार्म हाऊस या ठिकाणीही नागरिकांची गर्दी होती. रात्री 12 वाजता फटाके फोडून 2020 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
‘अंनिस’तर्फे दूधवाटप
तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अलिबागच्या कार्यकर्त्यांनी अलिबाग एसटी स्थानकासमोरील दारूच्या दुकानाबाहेर दुधाचे वाटप केले. ‘द’ दारूतला नव्हे, तर ‘द’ दुधातला, असा संदेश देणारे फलक हातात घेऊन हे कार्यकर्ते दूध वाटत होते. ‘अंनिस’चे महासचिव नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …