कर्जत : प्रतिनिधी
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मंगळवारी (दि. 15) अभिवादन केले. कर्जत नगर परिषद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला रवींद्र लाड, बापू बहिरम, अविनाश पवार, दयानंद गावंड, हरिश्चंद्र वाघमारे, हृदयनाथ गायकवाड, निलेश देशमुख, कल्याणी लोखंडे, विभावरी म्हामूणकर, दिलीप लाड, निलेश निकाळजे, शेखर लोहकरे, रुपेश पाटील, महेंद्र पवार, सुदेश गायकवाड, सामिया चौगुले, मुकेश परदेशी, जयवंत उघडा, महेश दाभणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.