कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा रविवारी (दि. 13) कळंबोली सेक्टर 8 येथे हिंदुस्थान बँकेच्या बाजूला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.