मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी बाबा दांडेकर यांची निवड जाहीर होताच, भाजपतर्फे बाबा दांडेकर व उपाध्यक्ष मोअज्जम हसवारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासमवेत तालुका भाजप उपाध्यक्ष बाळा भगत, शहर अध्यक्ष उमेश माळी आदी उपस्थित होते. आण्णा कंधारे यांनी, चेअरमन बाबा दांडेकर हे सुपारी संघाच्या उत्कर्षासाठी निश्चित प्रयत्न करतील. सुपारीला सर्वोत्कृष्ठ भाव मिळण्यासाठी व बागायतदारांचे हित जोपासण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करून एक नवा आदर्शवत सुपारी संघाला मिळवून देऊन संघाच्या विकासासाठी ते प्रयत्न करून विकासाची दिशा दाखवून देतील असा विश्वास आण्णा कंधारे यांनी व्यक्त केला आहे. तालुका भाजप उपाध्यक्ष बाळा भगत यांनी सांगितले की, निवडणूक काळात बागायतदारांना दिलेल्या आशवासनाची पूर्तता निश्चित करून नवे धाडसी निर्णय घेऊन संघातील कर्मचारी वर्गाला ते निश्चित दिलासा देतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.