Monday , January 30 2023
Breaking News

एमएनएम विद्यालय व टीएनजी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

उलवे नोड : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 10) संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाले. या वेळी शैक्षणिक वर्षात विविध शालेय उपक्रमांत नैपुण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘युफोरीया अराऊंड द वर्ल्ड’ या शीर्षकाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
या सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, भाजपचे उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, भाजपचे तालुका चिटणीस वामनशेठ म्हात्रे, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, चंद्रकांत भोईर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, निर्गुण कवळे, साईचरण म्हात्रे, वर्षा नाईक, रामदास ठाकुर, शाळा समिती चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्युटन यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply