Breaking News

धोकेबाज उद्धव ठाकरेंना जागा दाखवा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल

मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मुंबई ः प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. मोदी-फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर विश्वासघात केला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी 2014मध्ये युती मोडली. उद्धव ठाकरेंना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (दि. 6) मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ते भाजपच्या बैठकीत बोलत होते. मुंबईतील भाजप नगरसेवक, पदाधिकार्‍यांची मेघदूत बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी 2014मध्ये आपल्यासोबतची युती तोडली. त्यांना वाटलेले आपल्याशिवाय भाजपचे काय होणार. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता, जो चुकीचा ठरला. जे धोका देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे. शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळे छोटी झाली. खयाली पुलाव शिजवल्यामुळे शिवसेना फुटून त्यांची वाईट अवस्था झाली, असेही ना. शाह म्हणाले. एकनाथ शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागा. बीएमसीसाठी भाजप-शिंदे गटाचे 150 जागांचे लक्ष्य असून मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार, असा विश्वास ना. शाह यांनी व्यक्त केला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply