Breaking News

पनवेल आगारात वाहतूक सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी
एसटीचालकांनी सुरक्षा पंधरवड्यापुरतेच नव्हे तर वर्षभर रस्त्यावर गाडी चालवताना सुरक्षेसाठी असलेल्या नियमांचे पालन करावे. सुरक्षित गाडी चालवल्यास अपघातग्रस्तांना द्यावे लागणारे कोट्यवधी रुपये वाचून महामंडळाला होणारा तोटा कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन एसटी मुंबईचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण विचारे यांनी शनिवारी (दि. 11) पनवेल आगारात सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन करताना केले.
  पनवेल एसटी आगारात 11 ते 25 जानेवारीदरम्यान पाळण्यात येणार्‍या वाहतूक सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 11 वाजता विभागीय वाहतूक अधिकारी अरुण विचारे, प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक धनराज शिंदे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक मोनिका वानखेडे, आगार व्यवस्थापक विलास गावंड, सहाय्यक वाहतूक अधिकारी उदय जुईकर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी पनवेल आगारातील चालकांना मार्गदर्शन करताना  अरुण विचारे यांनी दरवर्षी होणार्‍या अपघातांमुळे एसटीला कोट्यवधी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावे
लागतात. चालकांनी मद्यपान न करता खराब रस्ते आणि खराब हवामानात गाडी चालवताना खबरदारी घेतली तर अपघात कमी होऊन हे नुकसान टळू शकते, असे या वेळी त्यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक धनराज शिंदे यांनी शासनाने चालकांसाठी वाहतुकीचे जे नियम केले आहेत त्याचे पालन करावे. रस्त्यावरील सिग्नल आणि सूचना दर्शक फलकावरील सूचनांचे पालन करावे व ओव्हरटेकिंग करताना काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. आगारप्रमुख मोनिका वानखेडे यांनी चालकांना आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यामधील फरक एका कथेद्वारे सांगून चालकांच्या अतिआत्मविश्वासामुळे अपघात होऊन कसे नुकसान होऊ शकते याची जाणीव करून दिली. उदय जुईकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply