पनवेल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने रायगड सरस या स्वयंसहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन शहरातील गुजराती शाळेच्या मैदानात 10 ते 13 जानेवारी दरम्यान सुरु होते. या प्रदर्शनाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी सोमवारी भेट दिली. या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, राज पाटील, भरत म्हात्रे, वसंत काठावले, अभिजित म्हस्कर आदी उपस्थित होते.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper