Breaking News

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांची मेजवानी, सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त

क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये 15 ते 20 जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव होणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

बुधवारी (दि. 15) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार राजूदादा पाटील, आमदार महेंद्र थोरवे आदींची उपस्थिती असणार आहे. तर सिने अभिनेत्री जुई भेंडखळे हिची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 

बुधवारी जगदीश पाटील प्रस्तुत ठाणा बँड यांचा गाण्यांचा कार्यक्रम, क्रांतिवीर कला मंच विकी जाधव व शालेय नृत्याविष्कार सादर होणार आहे. गुरुवारी (दि. 16) ‘लिंबू कापला’ फेम मयूर नाईक व ‘आगरी झुझू किंग’ रणजीत ठाकूर यांच्या आगरी गाण्यांचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर या वेळी एकेरी खुली नृत्य स्पर्धा देखील होणार आहे. शुक्रवारी (दि. 17) ‘याल तर हसाल’ फेम संजीवन म्हात्रे हे मनोरंजनातून श्रोत्यांचे प्रबोधन करणार आहेत. शनिवारी (दि. 18) ‘एकच वादा राजु दादा’ फेम परमेश माळी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी मिस रायगड स्पर्धा होणार आहे. रविवारी (दि. 19) स्टेपआर्ट प्रस्तुत जल्लोष सुवर्ण युगाचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. तसेच पापलेट फेम चिंतामणी शिवडीकर, मेल-फिमेल आवाज फेम मोहन फुंडेकर हे आपली कला सादर करणार आहेत.

सोमवारी (दि. 20) देविदास पाटील प्रस्तूत रुप कला ऑर्केस्ट्रा, माझ्या देवाच नाव गाजतय फेम रोहित पाटील, द्रवेश पाटील यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, निलेशभोपी, विजय भोपी, सुशांत वेदक यांनी केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply