Breaking News

रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे मदत

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक

रोहे ः प्रतिनिधी

रोहे तालुक्यातील कवलठे या गावी भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. तेथील नागरिकांना तातडीची मदत म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे तूरडाळ, गोडेतेल, पोहे, मसाले, खोबरेल तेल, पेस्ट, लोणचे, अंगाचे साबण, कपड्याचे साबण आदी जीवनावश्यक जिन्नस असलेले पॅकेट्स 25 कुटुंबाना देण्यात आली. रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण या भागात शासकीय दौर्‍यावर होते. तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष संजय कोनकर यांनी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत वितरित करण्याचे आवाहन क्लबला केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. या वेळी रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या कार्याचा गौरव करून आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी तालुका समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार कविता जाधव, जिल्हा युवा अध्यक्ष अमित घाग उपस्थित होते. रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष गणेश सरदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमासाठी सेक्रेटरी निखिल दाते, क्लब डायरेक्टर राकेश कागडा, डॉ. कैलाश जैन, सुचित पाटील, प्रदीप मेहता, अशोक प्रजापती, सचिन कदम, महेंद्र राठोड, डॉ. प्रथमेश बुधे आदींची उपस्थिती होती.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply