Breaking News

इथिओपिआच्या धावपटूंचे वर्चस्व

कडाक्याच्या थंडीत मुंबई मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी
आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाची मुंबई मॅरेथॉन रविवारी (दि. 19) कडाक्याच्या थंडीत मुंबापुरीत रंगली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5.15 वाजता यंदाच्या 17व्या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 55 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेवर इथिओपिआच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. पुरुष गटात पहिले तीनही क्रमांक इथोपियन धावपटूंनी पटकावले, तर महिला विभागात दुसरा क्रमांक वगळता पहिल्या व तिसर्‍या क्रमांकावर इथोपियन धावपटूच राहिले.
पूर्ण मॅरेथॉन एलिट गटात पुरुषांमध्ये डॅरेरा हुरीसा (2 तास 8 मिनिटे 9 सेकंद), आयेले अ‍ॅबशेरो (2 तास 8 मिनिटे 20 सेकंद) आणि बिर्हानू तेशोमे (2 तास 8 मिनिटे 26 सेकंद) या इथोपियाच्या धावपटूंनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. महिलांमध्ये विभाग अ‍ॅमेन बेरीसो (2 तास 24 मिनिटे 51 सेकंद, इथोपिया), रोदाह जेपकोरीर (2 तास 27 मिनिटे 14 सेकंद, केनिया, हॅव्हन हैलू
(2 तास 28 मिनिटे 56 सेकंद, इथोपिया) यांनी पहिल्या तीन क्रमांकाना गवसणी घातली.  
पूर्ण मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात श्रीतू बुगाथा (2 तास 18 मिनिटे 44 सेकंद), शेर सिंग (2 तास 24 मिनिटे), दुर्गा बहादूर बुधा (2 तास 24 मिनिटे 3 सेकंद); तर महिला गटात सुधा सिंग (2 तास 45 मिनिटे 30 सेकंद), महाराष्ट्राची ज्योती गवते
(2 तास 49 मिनिटे 14 सेकंद) व श्यामली सिंग (2 तास 58 मिनिटे 44 सेकंद) अव्वल तीन ठरल्या.
अर्धमॅरेथॉमध्ये महिलांच्या गटात उत्तर प्रदेशची पारुल चौधरीने (1 तास 15 मिनिटे 37 सेकंद) पहिला क्रमांक पटकावला. मुंबई कस्टमची आरती पाटील (1 तास 18 मिनिटे 03 सेकंद) दुसरी आली, तर नाशिकच्या मोनिका आथरेला (1 तास 18 मिनिटे 33 सेकंद) तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या गटात हैदराबादच्या तीर्थ पुन (1 तास 5 मिनिटे 39 सेकंद) याने पहिला क्रमांक पटकावला. मान सिंगने (1 तास 6 मिनिटे 6 सेकंद) दुसरा, तर बलिअप्पा एबीने (1 तास 7 मिनटे 11 सेकंद) तिसरा क्रमांक मिळवला.
धावपटूचा मृत्यू
कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली होती. मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून धावत असताना गजानन माळजळकर (वय 64) त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. याशिवाय अन्य सात जणांनाही धावताना हृदयाचा त्रास जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply