Breaking News

कर्जत शिवसमर्थ बचत गटाला हिरकणी पुरस्कार

जिल्हा रायगड सरस 2020 प्रदर्शन

कर्जत ः बातमीदार

रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रायगड सरस 2020मध्ये कर्जत तालुक्यातील शिवसमर्थ बचत गट सरस ठरला असून कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून या बचत गटाचे काम सुरू आहे. शिवसमर्थ बचत गटाने हिरकणी पुरस्कार पटकावला. रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या उमेद अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रायगड सरस 2020चे आयोजन केले होते. पनवेल येथे भरलेल्या रायगड सरस 2020मध्ये जिल्ह्यातील असंख्य महिला बचत गटांच्या हिरकणी गटांनी आपले स्टॉल्स लावले होते. प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. उत्तम व्यवसाय करणार्‍या बचत गटांसाठी

स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक प्रकाश देवरूषी, अभियान व्यवस्थाक आर. आर. बघे उपस्थित होते. उत्कृष्ट सेवा आणि उत्तम व्यवसाय करणार्‍या बचत गटांमध्ये कर्जत येथील संसाधन समूह व्यक्ती रेखा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड सरस 2020मध्ये मांडण्यात आलेल्या शिवसमर्थ बचत गटाने हिरकणी पुरस्कार पटकावला. समूह संसाधन व्यक्ती शोभा शेंडे यांच्या जागृती महिला बचत गट आसल, तर नेरळ येथील ओम स्वयंरोजगार यांना दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे कर्जत तालुक्यातील बचत गटांचे कर्जत तालुका व्यवस्थापक नेमाडे, प्रभाग समन्वयक मनोहर जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक तेलवणे यांनी कौतुक केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply