Sunday , February 5 2023
Breaking News

पेणजवळ भीषण अपघात कार आणि एसटी बसच्या धडकेत चौघे जागीच ठार

पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम गावानजीक रविवारी (दि. 19) सायंकाळी इको कार आणि एसटी बसची धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच मृत्युमुखी पडले, तर काही जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इको कार (एमएच 01 सीजे 3922) मुंबईच्या लालबाग येथील असून, महाडकडे जाणारी एसटी महामंडळाची बस (एमएच 14 बीटी 4910) सायंकाळी 4.30 ते 5च्या दरम्यान पेण तालुक्यातील कोलेटी वाडी येथे आली असता, तिची व समोरून येणार्‍या इको कारची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील संतोष दयाराम भोनकर (वय 41, रा. धोबीघाट-मुंबई), संतोष सीताराम साखरकर (42, मानखुर्द-मुंबई), चांदोरकर (40) आणि आणखी एक व्यक्ती असे चौघे जागीच ठार झाले आहेत. जखमींची संख्या मिळाली नसली, तरी दोन जणांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply