Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विरंगुळा केंद्र, पथदिव्यांचे लोकार्पण

मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीतून कळंबोलीत सुविधा
कळंबोली : रामप्रहर वृत्त
भारतीय माथाडी कामगार संघटनेचे रायगड उपाध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे रामदास महानवर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त नगरसेविका मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्र आणि पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा विद्यामान नगरसेविका मोनिका महानवर यांच्या माध्यामतून कळंबोलीत विकासाची अनेक कामे केली जात आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 1, 2 व 3मध्ये विविध ठिकाणी पथदिवे बसवण्यात आले आहेत तसेच सेक्टर 2ई येथील उद्यानात विरंगुळा केंद्र साकारण्यात आले आहे.
या विकासकामांचा लोकार्पण सोहळा भाजप युवा नेते रामदास महानवर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील, अशोक मोटे, बबन बारगजे, रामदास महानवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply