नागोठणे : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाचा नागोठणे येथील मुख्य कार्यक्रम येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात पार पडला. सरपंच डॉ. धात्रक यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. स्थानिक जि. प. सदस्य किशोर जैन, रोहे पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, माजी सरपंच फरमान दफेदार, विलास चौलकर, लियाकत कडवेकर, रियाज अधिकारी, उपसरपंच सुरेश जैन, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक तसेच सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन, राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत प्रभुआळीतील राजश्री लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका, पतपेढ्या तसेच अनिरुद्ध उपासना केंद्रात ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे पथनाट्य नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामपंचायत कार्यालय तसेच एसटी बसस्थानकात स्वच्छ भारत अभियान या विषयावरील पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्यात ऋतिका काफरे, मयुरी केंडे, निकिता कापसे, मोनिका राऊत, रोशनी भोईर, सिद्धेश भोईर, प्राची दांडेकर, हर्षदा पाटील, श्रुती पाटील, भावना मोटे, सत्यम सानप, उत्तम बावधाने अदिती नागोठकर, ऐश्वर्या घासे आदी विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते. सदर पथनाट्ये प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी सादर केली. यासाठी प्रा. डॉ. ज्योती प्रभाकर, प्रा. विकास शिंदे प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी विशेष सहकार्य केले.