Tuesday , February 7 2023

गणेशाच्या स्वागताला सजली वरदनगरी; महड येथे जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी

खोपोली : प्रतिनिधी

अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या महड (ता. खालापूर) येथे वरदविनायक गणेशाच्या जन्मोत्सव सोहळ्याला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, श्री गणपती संस्थान तर्फे भाविकांसाठी सर्वसोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. 2020 कॅलेंडर वर्षात एकही अंगारंक चतुर्थी नसल्याने योगायोगाने आणि मंगळवारी (दि. 28) गणेश जंयती उत्सव आल्याने गणेशभक्तांना मोठी पर्वणी आहे.

नवसाला पावणारा अशी ख्याती महड येथील वरदविनायकाची असून जन्मोत्सवाच्या दिवशी नवस फेडणार्‍या आणि अपत्य प्राप्तीसाठी नवस करणारी शेकडो जोडपी श्रद्धेने महडला येतात. शनिवार (दि. 25) येथील उत्सवाला प्रारंभ झाला असून संस्थानाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. मोहिनी वैद्य यांच्या हस्ते गणेशाची महापूजा, पुण्यहवन, सहस्त्रावर्तने पार पडली. मंगळवारी गणेश जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरणाचे प्रबंधक (मुख्य खंडपीठ) सुरेश कल्याणराव जोशी यांच्या हस्ते गणपतीची महापूजा होणार आहे. पाली येथील हभप धनंजय गद्रे यांचे सुश्राव्य गणेश जन्म किर्तन होणार आहे. बुधवारी महड गावात पालखी मिरवणूक निघणार आहे. याशिवाय गुरूवारपर्यंत खालापूर, रसायनी, पुणे, नेरळ, कर्जत व पनवेल या भागातील नामवंत भजनी मंडळ व किर्तनकारांना श्रवण करण्याची संधी मिळणार आहे.

महड येथील माघी गणेश जन्मोत्सव सोहळ्याच्या पाच दिवसासात भाविकांची संख्या लाखाचा टप्पा ओलांडते, त्यामुळे सर्व सोयीसुविधा आणि सुरक्षेबाबत महड संस्थान विशेष लक्ष देत आहे.

-अ‍ॅड. मोहिनी मंदार वैद्य, कार्याध्यक्षा,

श्री गणपती  संस्थान, महड

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply