Sunday , February 5 2023
Breaking News

कर्जतमध्ये भाजपच्या बैठका उत्साहात

कडाव ः प्रतिनिधी

कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण कर्जत तालुक्यात भाजपच्या झंझावाती बैठकांना सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, नितीन कांदळगावकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, तालुका सरचिटणीस पंकज पाटील, राजेश भगत, ऋषीकेश जोशी आदी नेत्यांनी बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. नवनवीन विविध पक्षांतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली असल्याने भविष्यात कर्जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (दि. 2) कर्जत नगर परिषद हद्दीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सकाळी 11 वाजता शहरातील कोतवालनगर परिसरात राहणारे भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत अमूल्य मार्गदर्शन केले. या वेळी काही कार्यकर्त्यांनीही आपल्याला काम करताना स्थानिक पातळीवर येणार्‍या अडचणींसंदर्भात चर्चा केली. यापुढे फक्त प्रामाणिकपणे काम करीत राहा. पक्ष संघटना व मी स्वतः आपल्याकडे लक्ष देईन, असे आश्वासन मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी दिले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply