Breaking News

विकास फक्त महायुतीच करू शकते -विनोद घोसाळकर

श्रीवर्धन : प्रतिनिधी 

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर श्रीवर्धनची ग्रामदेवता श्री सोमजाई देवीचा आशीर्वाद घेऊन शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 8) सकाळी प्रचाराला सुरुवात केली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार नशीब आजमावत असून, त्यापैकी शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी सपत्नीक दसर्‍याच्या मुहूर्तावर  सोमजाई मातेच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचारास सुरुवात केली. या वेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे, भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, प्रतोश कोळथकर, शिवसेना शहरप्रमुख राजूशेठ चव्हाण, नगरसेवक अनंत गुरव, प्रितक श्रीवर्धनकर, सुनील दर्गे,  भगवान मुरूडकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासाचे मुद्दे घेऊन मी प्रचाार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विकासाची गंगा आणली, मात्र ती विरोधकांनी श्रीवर्धनपर्यंत येऊ दिली नाही, मात्र विकास फक्त महायुतीच करू शकते, हे मी मतदारांना सांगणार आहे, असे विनोद घोसाळकर  म्हणाले.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply