Breaking News

कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत रॅली

नागोठणे : प्रतिनिधी

कुष्ठरोग व क्षयरोगाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील कोएसोच्या कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. वरिष्ठ क्षयरोग परिवेक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर, कदम, कापसे, वारगुडे, भाऊ आमडोसकर यांसह प्रशिक्षणार्थी परिचारिका व राष्ट्रीय सेवा योजनेचे 140 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply