नागोठणे : प्रतिनिधी
येथील तलाठी कार्यालयाचे प्रमुख अनंत म्हात्रे 35 वर्षांची सेवा बजावून 31 जानेवारीला निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ रोहे येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी डॉ. माने यांच्या हस्ते म्हात्रे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नागोठणे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल यांसह कर्मचारीवर्ग उपस्थित होता. 1985 साली बागमांडला, श्रीवर्धन येथून नोकरीस प्रारंभ केल्यावर म्हात्रे यांनी 35 वर्षांच्या सेवेत खांब, वरवठणे, पळसगाव, तिसे, पाटणसई, उद्धर व नागोठणे येथे तलाठी म्हणून काम पाहिले.