सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक…देशाच्या प्रत्येक शत्रूला त्याची जागा दाखवून देणे हे प्रत्येक भारतीय देशभक्ताचे काम आहे. मग ते स्ट्राईक सीमेपलीकडे असो, सीमेवर असो वा सीमेदरम्यान असो. सीमेवर आपले सैन्य ही कामगीरी चोख बजावत आहे, मात्र देशांतर्गत निर्माण होणारे शत्रू आणि त्यांच्या आक्रमणांना आपल्यालाच प्रत्युत्तर द्यायचे आहे. यासाठी कोणाला बंदूक हातात घ्यायची गरज नाही. केवळ आपली ज्ञानेंद्रिय उघडी ठेऊन समाजात आणि सभोवताली घडणार्या अपप्रवृत्ती, अस्वच्छता, संशयास्पद हालचालीवर आपल्याला नजर ठेवणे आहे. समाजात घडणार्या वाईट आणि असामाजिक गोष्टींना आपल्यालाच आळा घालायचा आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाला केवळ देशप्रेम बाळगून चालणार नाही, तर ते कृतीतून सिद्ध करून देता आले पाहिजे. यासाठी आपल्याला वेगळे काहीच करायची गरज नाही. केवळ सुजान आणि समजदार नागरिक व्हा… बस्स एवढे पुरेसे आहे.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच त्यांनी प्रत्येक भारतीयाला देशाप्रती काय कर्तव्य आहेत व यासाठी प्रत्येक नागरिक काय करू शकतो याचे प्रबोधन करून प्रत्यक्ष कृती केली आहे. महात्मा गांधी यांचा आदर्श घेऊन मोदी यांनी देशात स्वच्छ भारतची मोहीम राबवून एक प्रकारची क्रांतीच घडवून आणली आहे. आपले घर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हीसुद्धा एक देश सेवा आहे. आज भारतातील बहुतांशी नगरपालिका शहरे कचरामुक्त झाली आहेत. हीसुद्धा कचर्याविरोधात केलेली एक प्रकारची लढाईच आहे. सर्जिकल स्ट्राईकच आहे आणि ती आपण जिंकली आहे. आता यापुढे प्रत्येक गाव, कचरा आणि प्लास्टिकमुक्त करून दुसरी मोठी निर्णायक लढाई आपल्याला जिंकायची आहे. महानगर, शहर आणि गाव स्वच्छ आणि सुंदर झाली, तर आपोआपच आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर होणार आहे.
समाजात वावरत असताना, आपली दैनंदिन कामे करत असतानाही आपण प्रत्येक जन देश सेवा आणि देश संरक्षण करू शकतो. समाजात घडणार्या अपप्रवृत्ती, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून योग्य वेळी पोलीस यंत्रणेला कळविणे, समाजात गैरसमज आणि अफवा पसरवून समाजा समाजात तेढ निर्माण करणार्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणे आणि या सोशल मीडियाचा योग्य वापर करून समाजाचे आरोग्य राखणे हेदेखील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महिला मुले आणि वृद्ध्र व्यक्तींना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हीदेखील प्रत्येक भारतीयाची सामाजिक जबाबदारी आहे. कायद्याने कर भरणे आणि कर चुकविणार्यांना शासन घडवून आणणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे. यासाठी खरेदी करताना प्रत्येक गोष्टीवर कर भरूनच खरेदी करावी. कायद्याचे पालन करून दुसर्याला त्रास न देता जीवनाचा आनंद घेणे आणि जगणे ही देखील एक प्रकारची देशभक्ती आणि देश सेवा आहे. यासाठी आपल्याला कोणालाही सीमेवर लढाईला जायची गरज नाही.
अस्वच्छतेविरोधातील आणि असामाजिक तत्त्वांविरोधातील या लढाईत स्वतः प्रधानमंत्री आपल्या सोबत आहेत. भारताला जगात महासत्ता बनविण्यासाठी मोदी अथक प्रयत्न करत आहेत. देशाची आर्थिक स्थिती सुधरविण्याबरोबरच इतर देशांबरोबर सलोख्याचे संबध ठेवण्यात मोदी यशस्वी होत आहेत. याचबरोबर शत्रू राष्ट्रांवर वचक आणि जरब ठेवण्यातही मोदी यशस्वी झाले आहे. त्यांच्यावर टीका न करता, त्यांच्या या महान कार्यात योगदानाचा वाटा देण्याची गरज आज प्रत्येक भारतीयाची आहे. हीच खरी देशभक्ती आहे… आणि देश सेवा आहे!
-ाहशड ळडचवश