Breaking News

तालुक्यातील 17 गावांचा म्हसळा पोलीस ठाण्यात समावेश करण्याची मागणी

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यातील 82 पैकी 17 महसुली गावे दिघी सागरी, गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या ते अडचणीचे होत आहे. म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी, रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही 4164 लोकसंख्येची सहा गावे दिघी सागरी पोलीस ठाण्याला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद खानीखार, गडदाब, विचोरवाडी ही 5034 लोकसंख्येची 10 गावे गोरेगाव पोलीस ठाण्याला  व आडी महाड खाडी हे 491 लोकसंख्येचे एक गाव श्रीवर्धन पोलीस ठाण्याला जोडले आहे. त्यामुळे या 17 गावांतील 9689 ग्रामस्थांना आपापसातील वाद व किरकोळ तक्रारी करण्यासाठी अन्य ठिकाणच्या पोलीस ठाण्यात जावे लागते, तर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पुन्हा तालुका मुख्यालयात यावे लागते. हे ग्रामस्थ व प्रशासनाला खर्चिक व वेळकाढूपणाचे होत आहे. अशाच पद्धतीची अडचण तालुक्यात व गावागावांत शांतता व सुव्यवस्था राबविणार्‍या पोलीस पाटीलांची  होत असते. पोलीस पाटीलाना शांततेबाबत तसेच गुन्ह्याची माहिती संबधीत पोलीस ठाण्याला व  सुव्यवस्था (साथ व जलजन्य रोग, दुष्काळ, पाणी टंचाई) या विषयीची माहिती महसुल प्रशासनाला द्यावी लागते. पोलीस पाटीलांची नेमणूक उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्या मार्फत होत असते. निवडणूकीच्या कालावधीत सभा घेणे, मिरवणुका काढण्याबाबत संबधीत पोलीस ठाण्याला अर्ज द्यावा  लागतो, तर तालुक्यात नेमलेल्या निवडणूक अधिकार्‍यांकडून ना हरकत घ्यावी लागते. राजकीय दृष्टीकोनातून कार्यकर्त्यचा वेळ व खर्च वाढतो.

सर्वसाधारणपणे एक लाख लोकसंख्येसाठी किंवा तालुक्यासाठी एक पोलीस ठाणे, असा निकष आहे. 2011 च्या जनगणनेनुसार म्हसळा तालुक्याची लोकसंख्या 59 हजार 941 आहे. अन्य पोलीस ठाण्याला जोडलेल्या तालुक्यातील 17 गावांचा समावेश  म्हसळा पोलीस ठाण्यात करावा, यासाठी पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.


-महादेव पाटील, माजी सभापती, म्हसळा पंचायत समिती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply