Wednesday , February 8 2023
Breaking News

बास्केटबॉल स्पर्धेला खांदा कॉलनीत प्रतिसाद; महान खेळाडू कोबी ब्रायंट यांना श्रद्धांजली

पनवेल : वार्ताहर

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे नुकतेच दुर्दैवी अपघाती निधन झाले. या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने ब्लॅक मांबा बास्केटबॉल स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत शेकडो खेळाडू सहभागी झाले होते.

बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील, सचिव नईम चिकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विवेक गोरे, आकाश चाकने यांच्या पुढाकाराने खांदा कॉलनीतील महात्मा स्कूल मैदानावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून रायगड जिल्ह्याची राज्यस्तरीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावली असून, जिल्ह्यामधे बास्केटबॉल हा खेळ वाढण्यासाठी व दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित गायकवाड, लोकेश शेट्टिगर, शार्दुल चव्हाण, गुर्जिंदर सिंग परमार, किरण सत्वे आदींनी मेहनत घेतली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply