Breaking News

जाफरच्या नावावर महाविक्रम

नागपूर : प्रतिनिधी

रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाकडून खेळणार्‍या वासिम जाफरने आतापर्यंत कोणाला जमली नाही अशी कामगिरी केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या केरळविरुद्धच्या सामन्यात जाफरने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 12 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे जाफर रणजी स्पर्धेत 150वा सामना खेळत आहे.जाफरने 1996-97च्या हंगामात रणजी स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. रणजी स्पर्धेत सर्वाधिक 40 शतकांचा विक्रमदेखील जाफरच्या नावावर आहे. 2018मध्ये त्याने 11 हजार धावांचा टप्पा पार केला होता आणि आता स्वत:चा विक्रम मागे टाकत त्याने 12 हजार धावा केल्या. जाफरने भारताकडून 31 कसोटी सामन्यांत 34.10च्या सरासरीने 1 हजार 944 धावा केल्या आहेत. यात पाच शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर जाफरच्या नावावर दोन द्विशतकांची नोंद आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply