नवी मुंबई ः प्रतिनिधी
स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण मेहनत व समर्पणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतो, याच विचाराने प्रेरित होऊन यू अॅण्ड आयने नवी मुंबईतील तरुणींना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी मिस नवी मुंबईची सुरुवात केली. नऊ वर्षांच्या प्रवासादरम्यान यू अॅण्ड आय टीमने वर्षानुवर्षे हा कार्यक्रम उत्तम करण्यास परिश्रम घेतले. आज ही सौंदर्य स्पर्धा सर्वांत प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक आहे तसेच तरुणींना असंख्य संधी प्रदान करते. बरीच छाननी व निवड प्रक्रियेनंतर शेकडो सहभागी तरुणींमधून केवळ 16 स्पर्धक अंतिम फेरीत प्रवेश करतात, ज्यांना नंतर यू अॅण्ड आयच्या तज्ज्ञांच्या वतीने प्रशिक्षण दिले जाते. स्पर्धकांनी बुद्धिमत्तेसह आपल्या सुंदर चेहर्याने स्वतःला सादर करणे व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली छाप सोडणे, त्याचबरोबर एक समग्र व्यक्तिमत्त्व घडविणे आमचे उद्दिष्ट आहे, असे यू अॅण्ड आय एंटरटेन्मेंटचे अध्यक्ष सुरिंदरसिंग गुप्ता यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे स्पर्धक घडवण्याचे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अभिमान उंचावेल. यासाठी मिस नवी मुंबई 2020 स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे यू अॅण्ड आय एंटरटेन्मेंटमचे कार्यकारी संचालक हरमीत सिंग यांनी सांगितले. फोर पॉइंट्स वाशी येथे मिस नवी मुंबई 2020वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी अंतिम फेरीत दाखल झालेल्या 16 सौंदर्यवती घोषित करण्यात आल्या.
स्पर्धेची अंतिम फेरी 29 फेब्रुवारीला सिडको प्रदर्शनी सभागृहात होईल. या वेळी फोर पॉइंट्स संचालक राहुल बनसोडे, फोर पॉइंट्स सहकारी संचालक आलोक आनंद, एसके समूहाचे डॉ. संजीव कुमार, अशोक मेहरा (हॉटेल शिकारा), डॉ. वंदना जैन (एएचआय) उपस्थित होते. या वेळी सन्यास द बँडचे प्रमुख गायक मनमीतसिंग गुप्ता, त्यांच्या बँडचे सदस्य सोहम दोशी आणि रोहन जाधव यांनी आपल्या सुमधुर सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.
अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सौंदर्यवती- इशिता शहा, स्मृती द्विवेदी, शिवानी पद्मनाभ, निकिता म्हात्रे, रियंका आचार्य, कहकशन ठाकूर, तन्वी सुर्वे, भाविका वाचणी, प्राची सिंह, डॉली खत्री, प्रगती राव, आरती घिंदानी, सानिया, ललिता दुदानी, निमिषा पराशर, रिया मेक्कट्टुकुलम.