Breaking News

क्रिकेट स्पर्धेत धारणी संघ विजेता

मोहोपाडा : प्रतिनिधी

कै. कु. सार्थक राकेश खराडे याच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर 22 वर्षांखालील खेळाडूंची एकदिवसीय स्पर्धा नुकतीच खेळली गेली. या स्पर्धेत सीएचबी धारणी संघाने विजेतेपद पटकाविले, तर तळेगाववाडी संघ उपविजेता ठरला.स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंढे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले. तृतीय पारितोषिक कोन संघाने प्राप्त केले. मालिकावीर म्हणून तळेगाववाडीचा राहुल, उत्कृष्ट फलंदाज कोनचा अनिकेत, तर अंतिम लढतीचा सामनावीर विवेक व उत्कृष्ट गोलंदाजीसाठी राज या दोन्ही धारणीच्या खेळाडूंची निवड करण्यात आली. सर्वांना बक्षिसाने गौरविण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply