पनवेल : रामप्रहर वृत्त : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, राजकीय, साहित्य व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत काम करणार्या व्यक्तींचा युथ फोरम सोशल असोसिएशन यांच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्ताने देवीचा पाडा येथील आयडियल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम नुकताच झाला. यूथ फोरम सोशल असोसिएशनच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जातात.
या कायर्र्क्रमात पत्रकारिता क्षेत्रात मयूर तांबडे, केवल महाडिक, गणपत वारगडा; सामाजिक क्षेत्रात डी. के. भोपी, नरेंद्र भोपी, विजय कदम, सलमान गांगू, प्रशांत जाधव; शैक्षणिक क्षेत्रात यशवंत बिडे, किशोर पाटील, संदीप काठे; राजकीय क्षेत्रात विजय पवार; समालोचनात रोशन पाटील; क्रीडा क्षेत्रात अजित गवते (क्रिकेट), साजन पावशे (कुस्ती), अवंती
जाधव (कुडो); कला क्षेत्रात कौस्तुभ भाग्यवंत (तबला), चिन्मय साखरे (नृत्य); पर्यावरण : योगेश पगडे 8) संस्था : नेचर फ्रेंड सोसायटी, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, मॉडर्न योगी इन्स्टिट्यूट.