Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शिवजयंती उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त : बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली.

बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प अर्पण करून मानाचा मुजरा केला. या कार्यक्रमाला बँकेचे शाखा प्रबंधक विजय पाटील, प्रबंधक शैलजा ठाकेकर, विशेष सहायक अरविंद मोरे व दफ्तरी वामनराव गायकवाड उपस्थित होते.

या वेळी अरविंद मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केले की, प्रत्येकाच्या अंगात उत्साह व नवचैतन्य संचारते. हे केवळ छत्रपतींच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणामुळे व कर्तृत्वामुळेच. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. तसेच ते सर्वांचे उद्धारकर्तेसुद्धा होते. ते महिलांचा सन्मान करणारे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरण रक्षक होते. ते या मताचे होते की, किल्ल्यांच्या रक्षणासाठी जसे सैनिक, मावळे गरजेचे आहेत तेवढेच वृक्षसुद्धा किल्ल्याच्या व पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकर्‍यांचीही विशेष काळजी घेणारे होते. अशा या अष्टपैलू व्यतिमत्व

असलेल्या छत्रपतींना स्मरण करून त्यांच्या गुणांचे अनुकरण करणे फार गरचेचे असून ते सर्वांनी अवलंबिणे ही काळाची गरज आहे.

बँकेचे सन्माननीय ग्राहक रणजित चव्हाण, स्वराज पाटील, दत्तात्रय ननावरे, अरबाज, यशवंते, गुरुनाथ ननावरे व इतर ग्राहक उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply