Breaking News

दीड लाखांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त; पनवेल महानगरपालिकेची कारवाई

पनवेल ः बातमीदार : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी टपाल नाका येथील प्रगती ट्रेर्ड्सच्या गोडाऊनवर धाड घालून 750 किलो वजनाच्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या प्लास्टिक पिशव्यांची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे.

प्रगती ट्रेडर्समधून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे श्रीम. गलांडे यांनी सदरची धडक कारवाई करून 10 हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. यापूर्वीही प्रगती ट्रेडर्सकडून दंड वसूल करण्यात आला होता. या धाडीत आरोग्य निरीक्षक संजय जाधव व इतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून प्रतिबंधित प्लास्टिकचे संपूर्ण उच्चाटन होत नाही तोपर्यंत अशा धाडी सातत्याने घातल्या जातील, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply