Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कर्जत तालुक्यात 89 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात; हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध

कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार

तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक 15जानेवारीरोजी होत आहे. नऊ ग्रामपंचायतीमधील सदस्यपदाच्या 89जागांसाठी 164उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर पाच ग्रामपंचायतीलमधील 17 जागा बिनविरोध झाल्या असून त्यांची अधिकृत घोषणा 18 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणूका होत असेलेल्या कर्जत तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी सुरुवातीला 297 नामांकन अर्ज दाखल झाले होते.  छाननीत पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले. सोमवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 111 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 164 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये हुमगाव ग्रामपंचायतीमधील सात जागासाठी सहा नामांकन अर्ज प्राप्त झाल्याने ते सर्व अर्ज बिनविरोध झाले आहेत. त्यात अनुसूचित जमाती राखीव जागेवर कोणीही नामांकन अर्ज दाखल केला नाही, उर्वरित सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील अन्य 8 ग्रामपंचायत निवडणुकीत 11सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.आता ग्रामपंचायत निवडणुक रिंगणात तालुक्यात आठ ग्रामपंचायतीमधील 89 जागांसाठी 164 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. कोल्हारे ग्रामपंचायतीमधील 11 जागांपैकी प्रभाग 4 मधील अनुसूचित जमाती राखीव जागा बिनविरोध झाली असून 10 जागांसाठी आता 20 उमेदवार रिंगणात आहेत. जिते ग्रामपंचायतीमधील सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.पोशिर ग्रामपंचायतीमधील 11 जागांसाठी 25 उमेदवार उभे ठाकले आहेत. साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये 11 जागांसाठी 24 उमेदवारांत लढत होणाार आहे. कडावमधील 13 जागांसाठी 27 उमेदवार तर वैजनाथमधील 09जागांसाठी 26 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित तीन जागांसाठी सात उमेदवारांनी मतदारांना कौल लावला आहे. दामत भडवळ ग्रामपंचायतीमधील 13पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने तेथे आता 12 जागांसाठी 30 उमेदवार नशीब आजमावित आहेत.

नागोठणे विभागात चार ग्रामपंचायतींमध्ये लढत

नागोठणे : प्रतिनिधी

विभागात चार ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. सोमवार (दि. 4) पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती व त्यात या चारही ग्रामपंचायतींमध्ये काही उमेदवारांनी आपले अर्ज घेतले असून लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.  नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे आणि ऐनघर या चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. पळस, कोंडगाव आणि वरवठणे या ग्रामपंचायतींमधून प्रत्येकी नऊ, तर ऐनघरमधून पंधरा सदस्य निवडून येणार आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पळसमधून 33, कोंडगावमधून 29, वरवठणेतून 23 तर ऐनघरमधून 175 सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी शेवटच्या दिवशी पळस 12, कोंडगाव 10,  वरवठणे सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले मात्र तर ऐनघरमधून किती जणांनी माघार घेतली, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरवठणे ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जमातीची एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरित आठ जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असली तरी, स्थानिक पातळीवर हे पक्ष वेगवेगळ्या आघाडी करून जनतेला सामोरे जात आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply