Breaking News

पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे कोपर येथे असलेल्या डॉ. कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुभाष महादेव दोंदे मेमोरियल सेंटरमधील मुलांना विशेष भेट देण्यात आली. या वेळी पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या बसंती जैन, विमला जैन, किंजल कोटरिया, शितल कटारिया, निलम सोमानी, संजय जैन आदींनी त्या ठिकाणी जावून तेथील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. व संस्थेमार्फत भेट वस्तू त्यांना दिल्या. पूर्णदिवस त्यांच्या सोबत घालवून तेथील विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह वाढविला. यापुढे सुद्धा अशा प्रकारची मदत पनवेल परिसरातील विविध संस्थेमधील मुलांना करू असा विश्वास पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या बसंती जैन या वेळी यांनी व्यक्त केला.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply