Breaking News

दिशा महिला मंचच्या आवाहनाला कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कामोठे : रामप्रहर वृत्त

महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिशा महिला मंचने शिवलिंगावर दूध अर्पण करणे टाळावे, असे आवाहन कामोठे येथील ओम शिव शंकर सेवा मंडळ आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ शिवमंदिर तलाव येथे केले होते. या आवाहनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवलिंगावर दूध टाकल्याने बर्‍याच प्रमाणात ते वाया जाते व त्यानंतर अनेक दिवस त्या उग्र वासाचा त्रास जवळपास राहणार्‍या लोकांना होतो, हे टाळण्यासाठी जमा करण्यात आलेले दूध गरम करून प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात आले. दूध पिशव्या आदिवासीपाड्यात आणि लहान मुलांच्या वसतिगृहात देण्यात आल्या. हजारो लिटर दूध वाया न जाता त्याचा योग्य तो वापर झाला.  आपण घेतलेल्या अथक परिश्रमाला यश मिळाल्याने दिशा ग्रुपमधील हिरकणींनाही हा उपक्रम वेगळाच आनंद देऊन गेला. तसेच येथे जमा झालेले निर्माल्य खतनिर्मिती करण्यासाठी केंद्रात पाठवण्यात आले. या उपक्रमासाठी दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम आंधळे, उषा डुकरे, विद्या मोहिते, रेखा ठाकूर, ख़ुशी सावर्डेकर, दीपाली खरात, विद्या वायकर, भावना सरदेसाई, रूपा कवीश्वर, अश्विनी नलावडे, प्रतिभा पवार, भाग्यलक्ष्मी, अर्चना, शिल्पा चौधरी, प्रमिला झिंजाड यांनी अथक परिश्रम घेतले. मंडळांचे अध्यक्ष सखाराम जाधव, बाळाराम चिपळेकर, कार्यकर्ते रमेश म्हात्रे, किशोर गोवारी, संतोष म्हात्रे, जनार्दन गोवारी, विजय गोवारी, विश्वास पावणेकर यांचीही खूप मोलाची साथ मिळाली.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply