Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त उरणमध्ये विविध उपक्रम

उरण : वार्ताहर

उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांस 800 ते 900 महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

प्रमुख पाहुण्या डॉ. अरुंधती भालेराव व नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे होत्या. संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली फ्रेंड्स फॉर एव्हर मंडळाच्या कल्पना तोमर यांची मेळावा अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. धावपटू सुप्रिया राहुल माळी व मिस महाराष्ट्र याज्ञी देवेंद्र भोईर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

संस्था सचिव सीमा घरत यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संस्था खजिनदार दीपाली मुकादम यांनी देणगीदारांचे आभार मानले. गौरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या सल्लागार स्नेहल प्रधान आणि विभावरी पाडगावकर (मम्मी) यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.

कार्यकारिणी सर्व महिला पदाधिकारी-संस्थापकीय अध्यक्षा गौरी देशपांडे, संस्था अध्यक्षा कल्याणी दुखंडे, मेळावा अध्यक्षा कल्पना तोमर, माजी अध्यक्षा प्रमिला गाडे, माजी मेळावा अध्यक्षा प्रगती दळी, संस्था उपाध्यक्षा गौरी मंत्री, मेळावा उपाध्यक्षा डॉ. अनिता कोळी, सचिव सीमा घरत, संस्था उपाध्यक्षा ज्योत्स्ना येरुनकर, मेळावा सहसचिव शुभांगी शिंदे, मेळावा सहजनसंपर्क अधिकारी संगीता पवार, संस्था खजिनदार दीपाली मुकादम, मेळावा सहखजिनदार रिद्धी पारेख, संस्था सहसचिव नाहिदा ठाकूर, कार्यकारी सभासद अ‍ॅड. वर्षा पाठारे, दीपाली शिंदे, अफशा मुकरी आदींचे सहकार्य मिळाले.

कार्यक्रमात नादब्रम्ह महिला मंडळ, फेण्ड्स फॉर एव्हर, दुर्गा माता ग्रुप, मिशन पॉसिबल, उरण डॉक्टर असोसिएशन, मैत्री मंडळ, मराठा समाज महिला मंडळ, टर्निंग पॉइंट, जेएचके झुम्बा ग्रुप, ही क्लब, माय लेकरू ग्रुप, मिसेस किंज, स्टेप आर्ट मॉम्स, महालन सामाजिक संस्था नॉ. 1 व 2, अंबा देवी आणि उरण भगिनी मंडळ, राघोबा देव सोसायटी ग्रुप, नाभिक समाज मंडळ आदी महिला मंडळांनी सहभाग घेतला होता.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply