पनवेल : रामप्रहर वृत्त
अंजुमन-ए-इस्लाम या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलच्या सव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रस्तरीय ज्युनिअर तंत्रोत्सव 2020मध्ये लक्षणीय यश संपादन केले.
नुकत्याच वसई येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे आयोजित ज्युनिअर तंत्रोत्सव 2020या राष्ट्रस्तरीय तंत्रमहोत्सवात काळसेकर पॉलिटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन बहुतांशी स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले. अबसार मुकादम, मुस्तफा डांगे, अंकित गायकर, आफताब खान, समीर शेख, कैस बशीर खान, शेख साफवाण तनवीर, साफवाण फकी शकील, खान इनामुल हक, खान मोहम्मद अर्श, खान सोहेल, सय्यद मासूम अली, शाहनवाज सय्यद, झैद खान, अझमेन अन्सारी, अरफाज खान, काझी रेहान, फैझान शेख, हीना तमके, तनझीला सुरय्या आदी सहभागी विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये 6500 देऊन
गौरविण्यात आले.
या वेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुर्हाण हारीस, काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटगी, काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख रूपाली खडतर, महाविद्यालयीन प्राध्यापकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.