पनवेल : वार्ताहर
तालुक्यातील बारवई गावातील महिलांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ यांनी विशेष बैठक घेवून त्यांना कायद्यातील तरतुदी व घ्यावयाची सुरक्षितता या संदर्भात मार्गदर्शन केले. महिला दिनाचे औचित्य साधून बारवई गावातील महिला वर्गाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 35 महिलांनी सहभाग घेतला. त्यांना महिला दिनाचे महत्व व महिलांबाबत कायद्यातील तरतुदी व घ्यावयाची सुरक्षितता याबाबत माहिती दिली. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ, पोलीस शिपाई सोनकांबळे, पोलीस नाईक कर्डीले आदी उपस्थित होते. या निमित्ताने महिलांच्या विविध प्रश्नांना मार्गदर्शन करण्यात आले.