Breaking News

कामोठे पोलीस ठाण्यात महिला दिन

पनवेल : वार्ताहर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी पोलीस ठाण्यात महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे कौतुक केले. या वेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या, सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकारी, स्थानिक महिला उपस्थित होत्या. महिलांनी सुशिक्षित व सक्षम झाले पाहिजे तसेच समाजात आपले कर्तृत्व दाखवून वेगळा ठसा उमटविला पाहिजे, असे प्रतिपादन तुपे यांनी केले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण पोलीस ठाण्यात अंमलदार व मदतनीस म्हणून महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे पोलीस ठाण्याचे कामकाज देण्यात आले होते. उपस्थित महिलांच्या अडचणी समजावून घेवून त्यांच्या सर्व शंकाचे निरासन करण्यात आले. कामोठे पोलिसांचा हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अभिनव उपक्रम होय.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply