Breaking News

लाडवलीत दिवसाढवळ्या घरफोडी

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील करण कदम राहत असलेल्या भाड्याच्या घराचा दरवाजा फोडून शनिवारी (दि. 14) दुपारी अज्ञात इसमाने कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. गेल्या महिनाभरातील याच परिसरातील ही दुसरी घरफोडीची घटना घडली असून, त्यामुळे रहिवाशांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील पराग पांडे यांच्या स्नेहगंध या घरात करण शशिकांत कदम हे कुटुंबीय भाड्याने राहतात. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास करण आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून महाड बसस्थानकावर गेले होते. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील जोड तसेच नथनी चोरून चोरट्याने पोबारा केला. दरम्यान, हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक शैलेश सनस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply