लंडन : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरससंदर्भात जगभरात हाय अलर्ट देण्यात आला असून सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय, क्रीडा आणि सिनेक्षेत्रातील लोक कोरोनाबाबत काळजी घेताना दिसत आहे. अशातच पाकिस्तानने एक मोठा गोंधळ घातला. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळण्यास आलेल्या एका खेळाडूला कोरोना व्हायरस झाल्याचे परस्पर जाहीर केले. त्यामुळे या क्रिकेटपटूने राग व्यक्त केला आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील प्ले ऑफचे सामने कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आले. ही स्पर्धा खेळण्यास आलेल्या इंग्लंडचा अॅलेक्स हेल या खेळाडूमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या वृत्ताला पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनीदेखील दुजोरा दिला, पण प्रत्यक्षात असे काही
घडलेच नव्हते.
इंग्लंडचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेल्स याने खबरदारी म्हणून स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवल्याचे म्हटले होते. इकडे पाकिस्तान मीडिया आणि पीसीबीने हेल्सला करोना झाल्याचे जाहीर केले. या संपूर्ण प्रकरणावर हेल्स प्रचंड भडकला. त्याने रागात एक ट्विट केले. ’खोट्या बातम्या पसरवणे बंद करा. अशा प्रकारचे वागणे धोकादायक आहे’, असे हेल्सने म्हटले. हे ट्विट करताना हेल्सने रमीज राजा यांना टॅग केले आहे.