पनवेल : रामप्रहर वृत्त
वेनम स्पोर्ट्सच्या वतीने आणि रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने चौथी फुटबॉल प्रीमियर लीग (एफपीएल) 11 व 12 जानेवारी रोजी पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत 64 संघांचा सहभाग निश्चित झाला असून, यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, यवतमाळ, हुबळी (कर्नाटक) येथील संघ आपला खेळ दाखविणार आहेत.
विशेष म्हणजे स्पर्धेतून जमा झालेल्या रकमेतून जिल्हा परिषद शाळेतील तसेच आदिवासी मुलांना मोफत फुटबॉल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेस्थळी एक डोनेट बॉक्स ठेवण्यात येणार आहे, ज्यात जर्सी, बूट असे साहित्य देता येईल.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …