Breaking News

जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कर्जत ः प्रतिनिधी

केंद्र व राज्य सरकारच्या योजना अनेकांना माहीत नसतात. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. कर्जत तालुक्यात आपला पक्ष चांगले काम करीत आहे. यापुढे बूथ कमिट्यांची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून आपले काम अधिक गतीने सुरू करावे, असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी युवा कार्यकर्त्यांना सूचित केले. कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बुथ अध्यक्ष अविनाश केलटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, उपसरपंच मनीषा घाडगे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, सरचिटणीस दीपक बेहरे, नितीन कांदळगावकर, संजय कराळे, मंदार मेहेंदळे, बिनीता घुमरे, सरस्वती चौधरी, शाखा अध्यक्ष वैभव सावंत, तृषाली मुंढे, किरण घाग, उपाध्यक्ष स्वप्नील कोतेकर, आदी उपस्थित होते. नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून ’सबका साथ सबका विकास’ची अंमलबजावणी सुरू झाली, असे सांगून कर्जतच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवा, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. दीपक बेहरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सरचिटणीस रुपेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. या वेळी बोलताना रमेश मुंढे यांनी, ’या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ती पुन्हा कशी येईल यासाठी सर्वांनी मेहनत घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. मंगेश म्हसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. वसंत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास प्रशांत उगले, विनायक कोतेकर, रवींद्र सोनावणे, बाबू मुंढे, हेमंत केलटकर, रमेश चव्हाण, संभाजी केलटकर, अमित कदम, अजय केलटकर, गुरूनाथ वाघमारे यांच्यासह महिला मोर्चाच्या सुशीला केलटकर, कविता सावंत, रूपाली चव्हाण, वत्सला जाधव, शैला केलटकर, सुशीला चव्हाण, मालती केलटकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

महिलांचा भाजपमध्ये प्रवेश

या वेळी राणी ढगे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले तसेच ढगे यांना महिला मोर्चा वेणगाव पंचायत समिती विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply