Breaking News

सुधागडात नेटवर्क समस्येने नागरिक बेजार

कंपन्यांचे दुर्लक्ष; प्रशासनाने लक्ष देण्याची जनतेतून मागणी

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील जनतेला नेटवर्कची समस्या भेडसात आहे. मोबाइल नेटवर्क सतत जाम होत असल्याने नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. इंटरनेट व नेटवर्क यावर आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र सुधागड तालुक्यात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे. सुधागड तालुक्यात सर्वत्र मोबाइल आहेत. पण इंटरनेट व रेंज नाही अशी समस्या निर्माण झाली आहे.  इंटरनेट व नेटवर्कचा सर्वत्र बोजवारा उडाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. आयडीया, वोडाफोन, एअरटेल, टाटा डोकोमो, आदी सिमला नेटवर्क (रेंज) नसल्याने नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी व अडीअडचणीच्या प्रसंगी तातडीने संपर्क करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क समस्येमुळे ब्रॉडब्रॅन्ड, लँडलाईन, मोबाइल व इंटरनेट, सीसीटिव्ही सेवा बंद पडत आहे. तसेच इंटरनेटवर अवलंबून असलेली शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामे पुर्णपणे रखडली आहेत.  सुधागड तालुक्यातील मोबाइल नेटवर्क मागील महिनाभरापासून सतत जाम होत असल्याने हजारो मोबाइलधारकांची मोठी गैरसोय होत आहे. वीजपुरवठा खंडित झाला की, मोबाईल नेटवर्क गायब होताना दिसते. पालीसह संपुर्ण सुधागड तालुक्यात मोबाइल नेटवर्क समस्या अधिक गंभीर झाली आहे. मात्र या समस्येकडे सबंधीत कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. सबंधीत कंपन्यांनी मोबाइल नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आवश्यक व ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply