Breaking News

लाखोंचा कॉपर वायर स्क्रॅप चोरी; उरण-खोपटा येथील कॉन्टिनेंटल वेअर हाऊसमधील प्रकार

उरण : प्रतिनिधी

चायना देशातील हॅण्डन शहर येथून 20 जानेवारी 2020 रोजी 15 मॅट्रिक टॅन वजन असलेला आणि 64 लाख 50 हजार 805 रुपये किमतींचा कॉपर वायर स्क्रॅप 20 फुटी कंटेनर क्रं. सीबीएचयू-4188515 यामध्ये जेएनपीटी बंदरात पीएचके ग्लोबल इंटरप्राइजेस या पत्त्यावर पाठविण्यात आला होता. मूल्यांकन अधिकारी यांनी कंटेनरचे बॉटल सील कापल्यानंतर हा माल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले असून, या बाबत कॉन्टिनेंटल वेअर हाऊस खोपटा येथे मोठ्या किंमती मालाची चोरी झाल्याबाबतची घटना घडली असून याबाबत परिसरात खळबळ निर्माण

झाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या वृत्तानुसार, चायना देशातील 20 जानेवारी 2020 रोजी चायना देशातील हॅण्डन शहर येथील जिनशनगी मेटल प्रॉडक्ट्स कंपनी लि. 303-01-09 शिजी अमींग्यू कॉनगटाय रोड, काँगटाम, जिल्हा-हाडानसिटी हेबाय प्रॉव्हिन्स चायना-0560 येथून 15 मॅट्रिक टॅन वजन असलेला आणि 64 लाख 50 हजार 805 रुपये किमतीचा कॉपर वायर स्क्रॅप 20 फुटी कंटेनर क्रं. सीबीएचयू-4188515 यामध्ये जेएनपीटी बंदरात पीएचके ग्लोबल इंटरप्राइजेस (आयइसि नो, एफयुपीएल-3234 क्यू) या पत्त्यावर पाठविण्यात आले होते.

मात्र ज्याचा माल होता, त्याने एक्ससाईज ड्युटी न भरता 11 मार्चला भरल्यानंतर सोमवारी

(दि. 16 मार्च) मूल्यांकन अधिकारी यांनी कंटेनरचे बॉटल सील कापल्यानंतर संबंधित कंटेनरमध्ये असलेला 15 मॅट्रिक टॅन कॉपर गायब झाल्याचे निदर्शनास येताच जेएनपीटी सिमाशुल्क हाऊस न्हावाशेवा येथील अधिक्षक तथा प्रतिबंधक सुनिल कुमार व्ही. नायर (रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी उरण पोलीस ठाण्यात माल चोरी झाल्याबाबतची तक्रार केली. तसेच उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. ए. आशमी यांनी अज्ञात माल चोरांविरोधात भा. दं. वि. कलम 379 नुसार तक्रार दाखल केली असून, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी हे या प्रकरणी तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply