Breaking News

गृहनिर्माण संस्थांनी सूचनांचे पालन करावेे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचे आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि संसर्गजन्य आजार प्रतिबंध अधिनियम 1897 अंतर्गत कार्यवाही करत 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच कलम 144 अंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. अनावश्यक गर्दी टाळून कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. तरी देखील काही नागरिक किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी करताना आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोतर्फे नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 154ब (27) अंतर्गत नवी मुंबई क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्‍यांकरिता खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत-1) संस्थेच्या आवारात प्रवेश करणार्‍या व्यक्तीसाठी प्रवेशद्वारावरच सॅनिटायजर, साबण, पाणी इ. व्यवस्था करणे. 2) इंटरकॉमद्वारे सदस्यांना असणारी अन्नधान्य, भाजी, फळे इ. जीवनावश्यक वस्तूंची मागणी जाणून घेत त्याप्रमाणे जवळच्या किराणा माल दुकानदार किंवा भाजी-फळ विक्रेत्याकडे या मागणीनुसार ऑर्डर नोंदवणे व त्यानंतर संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ या वस्तू आल्यानंतर सुरक्षा रक्षकाद्वारे प्रत्येक सदनिका धारकला वस्तूंचे वाटप करणे किंवा एका वेळी कुटुंबातील  एका सदस्याला गेटजवळ बोलावून  वस्तूंचे वाटप करणे. 3) तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करते वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे. 4) अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फळे आदी वाटप गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी पुरवठा यंत्रणेद्वारे होईल याची काळजी घेणे. 5) परदेशातून आलेल्या किंवा हातावर होम क्वारंन्टाइनचा शिक्का असलेल्या व्यक्ती गृहनिर्माण संस्थेमध्ये असल्यास या व्यक्तींकडून क्वारंन्टाइन नियमांचे योग्य रीतीने पालन होत आहे का आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशांनुसार या व्यक्तींची आरोग्य तपासणी होत आहे का याकडे पदाधिकार्‍यांनी लक्ष पुरवावे. 6) महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी करण्याबाबत जाहीर सूचना आल्यास त्याबाबत गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांना कळविणे व त्यातील सूचनांचे पालन करणे. 7) काही अपरिहार्य कारण असल्याशिवाय संस्थेतील सदस्य घराबाहेर पडणार नाहीत याकडे पदाधिकार्‍यांनी लक्ष पुरवावे. 8) तसेच संस्थेच्या क्लब हाउस, गार्डनमध्ये सदस्य किंवा लहान मुले एकत्र येणार नाहीत याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. 9) सदस्यांना जिम, स्विमिंग पूल, गार्डन, क्लब हाउस, कॉमन गॅदरिंग इ. चा वापर करू देण्यापासून रोखावे. 10) संस्थेच्या इमारतील लिफ्ट, प्रवेशद्वार, कॉमन एरिया आदी निर्जंतुकीकरण करावे. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग सदस्य यांची विशेष काळजी घ्यावी.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply