Breaking News

नेरळच्या बाजाराचे सर्वत्र कौतुक

कर्जत : बातमीदार

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे, त्यात सोशल डिस्टन्स ठेवण्याचे सूचना राज्य सरकार करीत आहे. मात्र बाजार उघडला की गर्दी होत असून नेरळ येथे पोलिसांनी ग्रामपंचायतच्या मदतीने मैदानात बाजार भरवला आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्स ठेवून सुरू असलेल्या नेरळ गावातील मैदानातील बाजाराचे राज्याचे पोलीस महासंचालक एस. के. जैस्वाल यांनी कौतुक केले असून राज्यात सर्व शहरात ही संकल्पना राबविण्याबाबत सूचित केले आहे. तर दिल्ली शहरातील पोलीस यंत्रणेने देखील कौतुक केले. नेरळ येथील मैदानात भरलेला बाजार याची समाज माध्यमांनी घेतलेली दखल याची जोरदार चर्चा झाली आणि कौतुक देखील झाले. सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास चालणार मैदानातील बाजार हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

सर्व जिल्हा हद्द बंद 

कर्जत तालुक्यात येणार्‍या कल्याण, मुरबाड हद्दीमधील हद्द पोलिसांनी बंद केली आहे. कर्जत तालुक्यात शेलू आणि कळंब येथे नेरळ पोलीस ठाण्याकडून तर कर्जत-चौक, कर्जत-खोपोली रस्त्यावर कर्जत पोलिसांनी पथक उभे केले आहे. तेथून जिल्ह्या बाहेरील जीवनावश्यक वस्तू घेऊन येणारी वाहने वगळता अन्य कोणतीही वाहने कर्जत तालुक्यात येणार नाहीत याची काळजी घेत आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply