Breaking News

यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात चार टप्प्यांत होणार्‍या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. सन 2014मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते, आता मात्र सन 2019मध्ये या प्रमाणात 1 हजार पुरुषांमागे 911 महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, स्वीप (डतएएझ – डूीींशारींळल तेींशीी एर्वीलरींळेप रपव एश्रशलीेीं झरीींळलळरिींळेप) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यांसह विविध क्षेत्रांतील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.  महाराष्ट्रात 2004च्या लोकसभा निवडणुकीसाठी 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 एकूण मतदार होते. 2009 लोकसभा निवडणुकीत एकूण 7 कोटी 29 लाख 54 हजार 58 मतदार होते. यामध्ये 3 कोटी 81 लाख 60 हजार 162 पुरुष मतदार आणि 3 कोटी 47 लाख 93 हजार 896 महिला मतदारांचा समावेश होता.

2009च्या लोकसभा निवडणुकीत 2 कोटी 4 लाख 78 हजार 932 पुरुष मतदारांनी, तर 1 कोटी 64 लाख 87 हजार 190 महिला मतदारांनी नाव नोंदवले. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 8 कोटी 7 लाख 98 हजार 823  मतदारांनी नोंदणी केली. यामध्ये 2 कोटी 66 लाख 22 हजार 180 पुरुष मतदार होते, तर 2 कोटी 20 लाख 46 हजार 720 महिला मतदार होते. आता 2019मध्ये 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष, तर 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply