Breaking News

चारित्र्याच्या पावत्या सुपारीबाजाने देऊ नये

प्रकाश बिनेदार यांनी काढली कांतीच्या अब्रूची लक्तरे

पनवेल : रामप्रहर वृत्त

बेताल वक्तव्य आणि बेताल वागणुकीचा नमुना असलेल्या सुपारीबाजाने आपल्या चारित्र्याच्या पावत्या देणे म्हणजेच गाढवाने स्वतःला रंग लावून झेब्रा असल्याचे लोकांना दाखविण्यासारखेच आहे.सुरुवातीला अनिरुद्ध बापूंचा शिष्य म्हणून मिरवणार्‍या सुपारी मास्टरने वर्तमानपत्राच्या माध्यमातून घाणेरडा कारभार केल्यामुळे बापूंनी त्याला लाथ मारून हाकलले, हे तो विसरला असला तरी ते जगजाहीर आहे, अशा सणसणीत शब्दांत भाजपच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी स्वयंघोषित पत्रकार,  समाजसेवक आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वतःची लाल  करणार्‍या कांती कडूचा खरपूस समाचार घेतला आहे.

सद्गुरू श्री. धर्माधिकारी यांच्याबद्दल विष कालवण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या या महाभागाला श्री सदस्यांनी भरचौकात चोप दिला होता. सद्गुरूंबद्दल वाईट बोलण्याची ताकद आजपर्यंत कोणाच्यात झाली नाही आणि होणारही नाही, मात्र या सुपारीबाजाने आपल्या नेहमीच्या चलाखीने तेथेही शहाजोगपणा केला होता, मात्र तरीही याला तेथे माफी मागावी लागली होती, हे तो जरी विसरला असला तरी जनता कदापि विसरली नाही.  आपला देश व समाज हा महिलांप्रति आदर राखतो, पण हे महाशय खालच्या पातळीवर जाऊन महिलांवरही ताशेरे ओढण्याचे काम करत आल्याचे पनवेल आणि उरणच्या प्रकरणात दिसले आहे.  लेखणीचा वापर चांगल्यासाठी झाला पाहिजे, पण त्यासाठी तशी नीतीही लागते, मात्र या सुपारीबाजाने महिलांबद्दल बेताल वृत्त छापून आपली लायकी दाखवून दिली होती.

कोणताही सोहळा, कार्यक्रम करण्यासाठी पैसा लागतोच. मग हे महाशय मंगेशकरांचे महागडे कार्यक्रम कोणत्या खर्चातून करायचे, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी लोक त्यामागचे इंगित जाणून आहेत. ते ज्या पक्षाच्या विचार सेलचे आहेत

त्या पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना तरी या महाशयांचे  विचार कधी पटले आहेत का, असा प्रश्नही बिनेदार यांनी उपस्थित केला आहे.

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वतःच्याच वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून तीन-चार दिवस त्याच कार्यक्रमाचे फोटो पुन्हा पुन्हा छापण्याची स्टाईल सर्वांना माहीत आहे, मात्र या कार्यक्रमातील उपस्थित गर्दीचा फोटो कधीच टाकला जात नाही. यामागचे कारण आता सामान्य वाचकालाही समजू लागले आहे, असे स्पष्ट करून बिनेदार पुढे म्हणाले की, संस्था आणि संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी पोपटासारखे गोड गोड बोलून त्यांची फसगत करायची हा तर त्याचा हातखंडा आहे. एखाद्या विषयाचा बागुलबुवा करायचा आणि संघटना आणि पदाधिकार्‍यांमध्ये अपप्रचार करून संभ्रम निर्माण करायचा यात त्याची हातोटी आहे, मात्र कालांतराने संस्था आणि पदाधिकार्‍यांना त्याचे हे उद्योग लक्षात आल्यानंतर अनेकांनी त्याच्यापासून फारकत घेतली. आपले विचार दुसर्‍यांवर लादणे आणि हम करे सो कायदाप्रमाणे वागणार्‍या या महाभागाला त्याच्याच पक्षातील लोक विचारत नाहीत.

समाजसेवेचा आव आणणार्‍या आणि स्वयंघोषित समाजसेवक म्हणून परिचित असलेल्या या सुपारीबाजाला नगरपालिकेच्या निवडणुकीत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागून तोंडावर पडावे लागले होते. मी स्वतः तीन वेळा नगरसेवक, सभापती, मागासवर्गीय सेलचा रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून सन्मानाने काम करीत आहे, मात्र बर्‍याच काही गोष्टी माझ्याही हातात आहे. तूर्तास मी मूठ बंद करून संयम ठेवत आहे. या सुपारीबाजाने पुन्हा एकदा अगोचरपणा केल्यास त्याला त्याची जागा दाखवून देऊ, असा खरमरीत इशाराही बिनेदार यांनी दिला आहे.

अज्ञानी लोकांनी पालिका कारभारात नाक खुपसू नये

झाडे तोडणे, पाणी देणे, रुग्णालय, तहसील कार्यालयाबाबत आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याबद्दल आपल्याला त्या विषयात किती (अ) ज्ञान आहे हे कळते. मी स्वतः महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. पालिकेची ठेका देण्याची पद्धत व प्रथा मला माहीत आहे. त्यामुळे ज्यांना कळत नाही, त्यांनी त्यात अकारण नाक खुपसू नये, असे बिनेदार यांनी स्पष्ट केले आहे, तसेच पनवेल ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा व मर्यादित कर्मचारीवर्ग होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात केले. त्यामुळे खाटांची संख्या 100 होण्याबरोबरच ट्रामा केअर सेंटर, शवागार, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग तसेच शवविच्छेदन सुविधाही यात आहे. त्यामुळे सदर नवे रुग्णालय जवळपास तयार झाले आहे. लवकरच त्याचे लोकार्पण होईल, असेही बिनेदार यांनी या सुपारीबाजाला सुनावले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply