मुरूड : प्रतिनिधी
कारगील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोर ने कारगील युद्धाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निगडीत असलेल्या रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा यथोचित गौरव करण्यात आला.
या सत्काराला अलिबाग व मुरुड तालुक्यातील वरिष्ठ सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.सुभेदार सुभाष ाबू डोंगरे ,पी ओ आर महेश मुकुंद सप्रे,हवालदार कमलाकर भागोजी गायकवाड.नायक संतोष अर्जुन तावडे,दयानंद गजानन देसाई,व नायक विलास लखमा खारकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.रोटरी क्ल चे अध्यक्ष रो डॉक्टर किरण नाबर,रो निमिष परब,रो डॉक्टर राजेंद्र चांदोरकर ,रो डॉक्टर एस.येन.तिवारी,रो डॉक्टर दीपक गोसावी,रो जगदीश राणे,रो डॉक्टर निलेश म्हात्रे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करून संरक्षणाची जबाबदारी पार पडताना आलेले अनुभव कथन केले.
तर रोटरी क्लब चे अध्यक्ष रो डॉक्टर किरण नाबर यांनी सदरचा कार्यक्रम राबवताना आपणास आनंद होत असून देशाचे संरक्षण करणार्या महत्वाच्या घटकांचा सत्कार समारंभ रोटरी क्लब तर्फे झाला हा माझ्यासाठी अभिमानस्पद असून या पुढेही आम्ही असेच समाजभिमुख कार्यक्रम राबवून समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम रोटरी क्लब करेल असा विश्वास नाबर यांनी व्यक्त केला आहे.