Breaking News

कोरोना काळातील सेवाभावी कार्याबद्दल सफाई कर्मचार्‍यांचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले. स्वच्छता हीच सेवा मानून त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहण्यास मदत होत आहे. याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मंगळवारी (दि. 26) त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवले होते. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष राहुल जगताप, गौरव कांडपिळे, सदस्य अथर्व गुजारे, आकाश बाय, अजिंक्य भिडे, नितेश घुगे, विक्रांत कुंभार, आयुफ अकुला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply